Pimpri Fire News : पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग

एमपीसी न्यूज – पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना आज (सोमवारी, दि. 9) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याजवळ घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वातीन वाजता पिंपरी पोलीस ठाण्याजवळ महावीर चौकात काही वाहनांना आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्राचा एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विविध गुन्ह्यात पकडलेली वाहने पिंपरी पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या मैदानात लावलेली आहेत. ती वाहने जीर्ण झाली आहेत. दुपारी अचानक त्यातील दोन – तीन चारचाकी वाहनांना आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.


छायाचित्र : दिनेश घारे

पिंपरी पोलीस ठाण्याच्या जवळच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचे मोटार वाहतूक (एम टी) विभाग आहे. शहर पोलिसांना इथूनच वाहने दिली जातात. त्याच परिसरात एका कोपऱ्यात पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. त्यातील काही वाहनांना आग लागली. सुदैवाने ही आग पसरली नाही. तसेच यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जवळच पेट्रोल पंप, पोलीस वसाहत आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.