Pimpri : काळेवाडी येथील प्लायवुडच्या गोदामाला भीषण आग; 5 लाखांचे प्लायवूड जळून खाक

एमपीसी न्यूज- प्लायवुडच्या गोदामाला भीषण आग लागून या घटनेत 5 लाखांचे प्लायवूड जळून खाक झाले. ही घटना काल, शुक्रवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास काळेवाडी मधील विजयनगर किनारा कॉलनी येथे घडली.

वल्लभनगर अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी मधील विजयनगर किनारा कॉलनी येथे दिनेश मोटवानी यांचे प्लायवूडचे गोदाम आहे. या गोदामाच्या बाजूला असलेल्या दोन खोल्यांमध्ये असलेल्या कडब्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग पसरून शेजारच्या गोदामातील प्लायवुडने पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच रहाटणी, तळवडे, वल्लभनगर, पिंपरी, इत्यादी पाच केंद्राचे बंब तसेच टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो कंपनीच्या फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ही आग इतकी प्रचंड होती की, या आगीमध्ये गोदामातील प्लायवुड जळून सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.