Pimpri : नृत्याकरिता फिटनेस महत्वाचा – डॉ. नंदकिशोर कपोते

एमपीसी न्यूज – नृत्याच्या माध्यमातून भविष्यात ग्लॅमर प्राप्त होऊ शकते. त्यामुळे शास्त्रशुध्द शिक्षण घेणे काळाची गरज आहे, नृत्याकरिता फिटनेस हा महत्वाचा असतो. त्याकरिता डान्स फिटनेस विद्यार्थ्यांनी अवगत करावे, असे मत नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कपोते यांनी निगडी येथे व्यक्त केले.

नृत्यतेज अॅकॅडमीच्यावतीने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील बालभवन परिसरात नृत्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन सुप्रसिद्ध नर्तक व नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

  • यावेळी बॉलिवूड कोरिओग्राफर बंटी धारिवाल, नृत्यतेज अॅकॅडमीच्या संस्थापिका तेजश्री अडिगे, नृत्यतेज अॅकॅडमी संचालक अविनाश अडिगे , मनाली कानिटकर, भानुप्रिया दोशी, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.

तेजश्री अडिगे म्हणाल्या, “नृत्यतेज अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून शिकविण्यात येणार्‍या विविध नृत्य प्रकाराचा फायदा येथील मुलांना भविष्यात निश्‍चितच होणार आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने वेगळे काही तरी शिकणे गरजेचे आहे शास्त्रीय नृत्य शिकताना त्यातील शास्त्रशुद्धपणा जपणे आवश्यक आहे. प्रत्येक नृत्याचे शास्त्र शिकून घ्या. नृत्याबरोबर भारतातील विविध नृत्य शिकावे”

  • नृत्यासाठी पालक व विद्यार्थ्यांसाठी फिटनेस फॉर डान्स हे सेशन भानुप्रिया दोशी यांनी घेतले या नृत्य शिबिरामध्ये लोकनृत्य, सेमी क्लासिकल, बेली डान्स, बॉलीबूड, कटेंम्पररी या नृत्यांच्या सादरीकरणाने रसिकांना नृत्याची मोहिनी घातली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.