BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पाच दुचाकींची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी, भोसरीतून प्रत्येकी दोन आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा पाच दुचाकींची चोरी झाली आहे.

याप्रकरणी जितेंद्र गुलाबसिंग पाटील (वय 35, रा. आळंदी मरकळ रोड, चऱ्होली यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाशिकफाटा ब्रीज खालून चोरट्यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची एमएच-14-सीई-5932 ही दुचाकी चोरून नेली.

चिखीलीतील विरेंद्र शंकर म्हस्के (वय 36, रा. शरदनगर, चिखली) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. कृष्णानगर चौक येथील एका स्वीट होमसमोरून चोरट्यांनी म्हस्के यांची एमएच-14-बीएच-4433 ही 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी म्हस्के यांनी चिखली ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दीपक पुंडलिक सोनावणे (वय 31, रा. फेज-1, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनावणे यांची एमएच-15-सीझेड-4737 ही दुचाकी पार्किंगमधून चोरून नेली. तर अक्षत प्रदीप (वय 25, रा.फेज-1, हिंजवडी) येथून अक्षत यांची डब्ल्यूबी-26-झेड-2558 ही दुचाकी चोरून नेली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3