Pimpri : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज (दि .१२) अंत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.राज्य कर्मचाऱ्यांनी केलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आठवडा पाच दिवसांचा असेल. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी पासून होणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणी नुसार दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करावा हा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होता या प्रस्तावाला राज्य सरकारने आज हिरवा कंदील दिला.ठाकरे सरकार ने राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवांसाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा असणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.