Pimple saudagar : ‘उन्नती’च्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेत पाचशे विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. : Five hundred students and citizens participated in the environment friendly Ganeshmurti workshop of 'Unnati'

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे उदघाटन उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केले. यावेळी संस्थापक संजय भिसे उपस्थित होते.

पर्यावरणाची सुरक्षा व घरी बसून तयार केलेल्या गणेश मूर्तीचा आनंद मिळावा या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केली होती, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख संजय भिसे यांनी दिली.

कार्यशाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांना व मुलांना शाडू मातीचे मोफत वाटप करण्यात आले होते. यावेळी मुलांना व नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

हि कार्यशाळा दहा ते बारा या वेळेत घेण्यात आली.  कार्यशाळेचे संचालन भगवान भोसले व सुधीर लांडगे यांनी केले.

संस्थेचे संस्थापक संजय भिसे म्हणाले, आपण घरी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तीची आपल्या घरी प्रतिष्ठापना करून पर्यावरण संरक्षणास हातभार लावावा. तसेच त्या गणेशमूर्ती घरीच विसर्जन कराव्या व विसर्जन झालेल्या मातीत उन्नती सोशल फाउंडेशनकडून दिलेले तुळशीचे रोप लावावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.