Pimpri: कंपनीतील कामगारांनी चोरले पाच लाखांचे अ‍ॅल्युमिनिअम रॉड!

एमपीसी न्यूज – कंपनीतील कामगारांनीच पाच लाखांचे अ‍ॅल्युमिनिअम रॉड चोरून नेल्याची घटना मोहननगर येथे नुकतीच घडली. याप्रकरणी चार कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

ओमकार आंबिकाप्रसाद चौधरी (वय-26, रा. चिंचवड, मूळ उत्तर प्रदेश), मोनूकुमार वसंत सिंग (वय-24, रा. चिखली), हिम्मत उत्तम धनवडे (वय-40, रा. बिजलीनगर, चिंचवड), उमेश सुभाष बांगर (वय-26, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी ओमप्रकाश मेवाराम अग्निहोत्री (वय-59, रा. विमाननगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहननगरमधील अलिकॉन कास्टएलॉय लि. या कंपनीत नोकरीला आहे. आरोपी ओमकार चौधरी हा कामगार ठेकेदार, मोनूकुमार सुरक्षारक्षक सुपरवायझर, हिम्मत हा वाहनचालक असून उमेश हा कंपनीतील कामगार आहे. या चौघांनी कंपनीतील ट्रँगल यार्ड समोरील दोन लाखांचे 1400 किलो अ‍ॅल्युमिनिअम रॉड चोरून नेले.

याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी रॉड आणून दिले. आरोपींकडे अधिक चौकशी केल्यानंतर कंपनीतील यापूर्वी झालेल्या चोरीमध्ये आरोपींनीच 3300 किलो वजनाचे पाच लाखांचे अ‍ॅल्युमिनिअम रॉड चोरून नेल्याचे कबूल केले. आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.