Pimpri : ‘फायनान्स कंपनी’ची 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कर्जाबाबत चुकीची माहिती देऊन फायनान्स कंपनीची सुमारे 22 लाख 65 हजार 227 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश पोपट क्षीरसागर (वय 32), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय 32, दोघेही रा. वडगाव शेरी, पुणे), श्रीकृष्णकुमार वसंत टापरे (रा. रविवार पेठ, पुणे), राजीव उज्वल गायकवाड आणि उषा राजीव गायकवाड (दोघेही रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रशांत प्रल्हाद वाळेकर (वय 40, रा. कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी वाळेकर यांच्या फास्टट्रॅक हौसिंग फायनान्स कंपनीला कर्जाबाबत चुकीची माहिती देऊन सुमारे 22 लाख 65 हजार 227 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.