Pimpri : विवाहितेला घरात कोंडून तिचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिने पोलिसात तक्रार देण्यासाठी जाऊ नये, यासाठी तिला कोंडून ठेवले. ही घटना संत तुकाराम नगर येथे मे 2017 ते 6 जून 2019 या कालावधीत घडली.

पती सचिन थोरात (वय 45), सासू विजया थोरात (वय 73), सासरे शांताराम थोरात (वय 77), नणंद वंदना थोरात (वय 47, सर्व रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), नणंद नंदा ऊर्फ नेहा सूर्यकांत सावंत (वय 49, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेचा मे 2017 पासून किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करून छळ केला. तसेच महिलेकडे वेळोवेळी पैशांचं मागणी केली. तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेतले.

तसेच महिलेने तक्रार देण्यासाठी जाऊ नये, यासाठी आरोपींनी त्यांना कोंडून ठेवले. याबाबत गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.