Pimpri : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून पाच वाहने चोरीला

Five vehicles were stolen from Chakan, Pimpri and Wakad areas :याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

एमपीसी न्यूज – चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना मंगळवारी (दि. 21) उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चोरीचा पहिला प्रकार खेड तालुक्यातील वासुली फाटा येथे उघडकीस आला. याबाबत संपत प्रभाकर काळे (वय 35, रा. शिंदेगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी संपत यांची 17 हजार रुपये किमतीची मोटरसायकल (एमएच 14 / डीबी 1059) त्यांनी वासुली फाटा येथील डॉक्टर बसे यांच्या दवाखान्यासमोर पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी दुपारी साडे पाच ते साडे सहा वाजताच्या सुमारास घडला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार पिंपरी येथील मोरवाडी मध्ये उघडकीस आला. ऍंथोनी संदनम दास (वय 48, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी दास यांनी त्यांची बारा हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच 14 / एके 8226) दहा जुलै रोजी  सायंकाळी  साडेसात वाजता मोरवाडी येथील जय मल्हार हॉटेलच्या मागे पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 11 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर दास यांनी 21 जुलै रोजी फिर्याद दिली आहे.

दुचाकी चोरीचा तिसरा प्रकारही पिंपरी येथील मेन बाजार येथे उघडकीस आला. याबाबत रूपाराम हीराराम चौधरी (वय 39, रा. रहाटणी) यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चौधरी यांनी त्यांची पंचवीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच 14 / डीई 5687) 22 जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपरी मेन बाजार येथील महादेव टॉईज दुकानासमोर पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलिस करीत आहे.

दुचाकी चोरीची चौथी घटना 17 मार्च 2020 रोजी जय भवानी चौक, रहाटणी लिंक रोड येथे घडली. याबाबत चार महिन्यानंतर फिर्याद देण्यात आली आहे. अमजद जुल्फिकार खान (वय 36 रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी खान यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल (एमएच 11 / बीबी 2414 ) 17 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जय भवानी चौक, रहाटणी लींक रोड येथे पार्क केली होती.

भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आला.

दुचाकी चोरीची पाचवी घटना 19 मार्च 2020 रोजी दुपारी साडेबारा ते दोन या सुमारास कस्पटे कॉर्नर जवळ वाकड येथे घडली. याबाबत देखील तब्बल चार महिन्यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

चैतन्य हेमंत जहागिरदार (वय 30, रा. धानोरी पुणे) यांनी याबाबत अज्ञात चोरट्याचा विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी जहागीरदार यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची  मोटारसायकल (एमएच 12 / ईवाय 5810) कस्पटे कॉर्नरजवळ पार्क केली होती. भर दिवसा त्यांची दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली.

दरम्यान फिर्यादी हे लॉकडाऊनच्या काळात गावी गेले असल्याने गावाहून आल्यानंतर मोटारसायकलची शोधाशोध करून फिर्याद दिली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.