Pimpri : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किल्ले तिकोणा गडावर भव्य भगवा झेंडा

एमपीसी न्यूज – किल्ले तिकोणा गडावर गुढीपाडव्याचा (चैत्र शुक्ल प्रतिपदा) मुहूर्त साधून गडावरील उंच असणाऱ्या बाले किल्याच्या बुरुजा जवळ २५ फूट उंचीचा लोखंडी खांब उभारून त्यावर १० फूट उंच असा भगवा झेंडा जगताप घराण्याचे वंशज भूषण जगताप-देशमुख यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक युवकांच्या आणि शिवाजी ट्रेलच्या सहकार्याने लावण्यात आला.

गुढीपाडवा ह्या सणाला हिंदू धर्मात विशेषतः मराठी मुलखात अग्रगण्य महत्व आहे. पण, हा सण आपण फक्त घराबाहेर उंबऱ्यात गुढी उभारून, गोड जेवण करून पारंपरिक पद्धतीने आपण साजरा करतो. पण, त्यापुढे ४ पाउलं जाऊन साजरा करण्याचा हा प्रयत्न, तसेच आपल्या भागाला वरदान लाभलेल्या गडकिल्यांचे-ऐतिहासिक वास्तूंबद्दल आपुलकी सदभावनेने क्रूतण्यता व्यक्त करणे व सर्वात महत्वाचे म्हणजे किल्यावर येण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहित करण्याचा हेतू बाळगून हा उपक्रम केल्याची माहिती भूषण जगताप-देशमुख यांनी दिली. किल्यावर ध्वजाचि पूजा करून शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या जय घोष करण्यात आला.

  • भव्य असलेला झेंडा खूप लांबून सुध्दा लक्षवेधी ठरत असल्याने पंचक्रोशीत/परिसरात नवचैतन्य पसरले आहे, हा झेंडा वेळोवेळी बदलण्याची व या पुढे विविध उपक्रम राबवण्यासाठी “किल्ले तिकोणा पेठ परिसर भूमिपुत्र संघटना” या माध्यमातून काम केले जाईल व तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मार्गक्रमण केले जाईल अशी ग्वाही देण्यात आली.

त्यावेळी भुषण जगताप, सचिन मोहोळ, विकास मोहोळ, संकेत मोहोळ, शंकर मोहोळ, नीलेश मोहोळ, अमित मोहोळ, योगेश पडवळ, अक्षय मोहोळ,नवनाथ मोहोळ, अतुल मोहोळ, आदित्य मोहोळ, समीर मोहोळ, शाहीदास मोहोळ, आकाश मोहोळ, किरण मोहोळ, विकास मोहोळ, अजित मोहोळ यांच्यासह ७० शिवदुर्गप्रेमी उपस्थीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.