Pimpri : ‘भाजपला मत देऊन मी पस्तावतोय’; मोरवाडीत झळकला फलक

एमपीसी न्यूज – ‘भाजपला मत देऊन मी पस्तावतोय’, ‘भारताला आर्थिक महासत्ता बनवायची बढाई फक्त मारली, जीएसटी आणि नोटबंदी करुन पायातच कु-हाड घातली’, असे फलक पिंपरी-चिंचवड शहरात झळकले आहेत. या फलकावर ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र आहे मात्र हा फलक कोणी लावला. ते स्पष्ट झाले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येतोय असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांकडून ‘भाजपला मत देऊन मी पस्तावतोय’ असे फलक लावले जात आहेत. कोल्हापूरमध्ये असे फलक लावण्यात आले होते. आता पिंपरी-चिंचवड शहरात देखील या मजकूराचा फलक झळकला आहे.

पिंपरीतील मोरवाडी चौकात याबाबतचा एक फलक लावण्यात आला आहे. ‘भाजपला मत देऊन मी पस्तावतोय’, भारताला आर्थिक महासत्ता बनवायची बढाई फक्त मारली, जीएसटी आणि नोटबंदी करुन पायातच कु-हाड घातली, असा मजकूर असलेला फलक लावण्यात आला आहे. या फलकावर ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र आहे मात्र हा फलक कोणी लावला आहे. ते स्पष्ट झाले नाही.

अशा आशयाचा आणखी एक फलक पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात लागला असून त्यावर ‘पाकिस्तानला शिव्या घालून कारचा हप्ता चुकणार नाही, मुद्द्याचं बोलल्यावर हे सरकार एक दिवसही टिकणार नाही’ असे लिहिण्यात आले आहे.

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहरात ‘फलक’ वॉर सुरु आहे. भाजपने विकासकामे मार्गी लावल्याची जाहिरातबाजी केली आहे. आमचे आश्वासन आमचा पाठपुरावा या मजकुराखाली प्रश्न मार्गी लावल्याचे फलक लावले आहेत. तर, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. कामे अर्धवटअवस्थेत असताना फलकबाजी करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेतील रिंग मास्टर कोण ? आश्वासनांचे काय झाले ? असे विविध प्रश्न फ्लेक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादीने विचारले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.