Pimpri : फ्लोरिस्ट सेवा ऑनलाईन अन् गतिमान करण्यावर भर देणार -आनंद कुमार

उंड्री येथील कोरिथियन्स रिसोर्ट येथे इंडिया फ्लोरिस्ट असोसिएनची परिषद उत्साहात

एमपीसी न्यूज – भारतातील फ्लोरिस्ट व्यावसायिकांना संघटीत करणे, त्यांना विविध प्रकारचे प्रगत व अद्ययावत प्रशिक्षण देणे. राष्ट्रीयस्तरावर एक सक्षम नेटवर्क तयार करून ऑनलाईन फ्लॉवर्स केक, चॉकलेट, सॉफ्ट टॉईज, राखी, मिठाई आदींची डिलिव्हरी घरपोच तसेच, कॉर्पोरेट कंपन्या व संस्थांकडे केली जाणार आहे. त्यासाठी विश्‍वासपूर्ण आणि सुलभ पेमेंट प्रणाली, दर्जेदार उत्पादन, उत्कृष्ट सजावट आदी सेवा त्वरीत उपलब्ध करून देण्यासाठी असोशिएनच्या माध्यमातून व्यासपीठ तयार करून दिले आहे, असे प्रतिपादन इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कुमार यांनी केले.

इंडिया प्लोरिस्ट असोसिएशनच्या वतीने दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेत पुण्यातील उंड्री येथील कोरिथियन्स रिसोर्ट येथे नुकतीच झाली. यात मार्गदर्शन करता ते बोलत होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट फ्लोरिस्टना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी असोसिएशचे उपाध्यक्ष श्रीकांत कनोई उपस्थित होते.

  • या परिषदेमध्ये देशभरातील 200 पेक्षा अधिक प्लोरिस्ट, पुष्पउत्पादक, अ‍ॅक्सेसरिज व फ्लॉवर पॅकींग मटेरियल सप्लायर उपस्थित होते. या परिषदेत ‘शाश्‍वत व्यवसाय वृद्धी, तंत्रज्ञानाच्या सहायाने उत्पादकतेत सुधारणा’, ‘कुशल कारागीर निर्मिती व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. व्यवसाय वाढीसाठी नेटवर्कींग महत्वाचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या माध्यमाचा वापर करावा, आदींची माहिती बी.एन.आय.चे भरत डागा यांनी दिली.

कार्यक्रमात ‘रिटेल फ्लोरिस्ट ऑफ द इअर 2019’ हा पुरस्कार स्नेह फ्लोरिस्ट चिंचवडचे पंढरीनाथ म्हस्के यांना प्रदान करण्यात आला. तसेच, जयपूरचे विनीत चोप्रा, मुंबईच्या बबिता टेक्रीवाले, औरंगाबादचे अभिजीत लाहोटी, गोम्स आयेशा, पुुण्याचे कुणाल बाफना, कोलकताचे पूजा सिंघानिया, हैदराबादच्या नम्रता काबरा, आश्विन सैनी, गुरगाव येथील विवेक गुलाटी यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

  • श्रीकांत कनोई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे समन्वयक पंढरीनाथ म्हस्के यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.