Pimpri: दुकाने, कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा, अन्यथा बंदची कारवाई – आयुक्त हर्डीकर

Follow social distance in shops, companies, otherwise close action - Commissioner Hardikar

रस्त्यावर थुंकल्यास गुन्हे दाखल करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने, कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या आस्थापना सुरक्षित अंतर पाळत नाहीत. त्या आस्थापनांवर बंद आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. रस्त्यावर थुंकणा-यांकडून दंड वसूल केला जात आहे. गरज पडल्यास थुंकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, ज्या आस्थापना सुरक्षित अंतर पाळत नाहीत. त्या आस्थापना बंद करण्याची तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल. दुकान, कंपनीत काम करणा-या, दुकानात येणा-या प्रत्येक नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी आस्थपना मालकाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

अनेक नागरिक आजही बेदरकारपणे सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसतात. हे अत्यंत लाजिरवाणी आणि किळसवाणी गोष्ट आहे. कोणत्याही नागरिकाबाबत आपल्यात आदर भाव नसल्याचे हे लक्षण आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. रस्त्यावर थुंकणा-यांकडून दंड वसूल केला जाईल. पण, गरज पडल्यास थुंकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

शहरात अनेक गरीब नागरिक राहतात. झोपडपट्टीत कंटेन्मेंट भागातील नागरिकांना बाहेर पडून देत नाहीत. बाकीच्या नागरिकांना कोणतीही आडकाठी नाही. बाहेर सार्वजनिक ठिकाणी फेसमास्कचा वापर करावा, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.