Pimpri : पिंपरी चिंचवड न्यायालयाची १६ एकर जागेसाठी पहाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालयाची प्राधिकरण येथील १६ एकर जागेवर बांधकाम तातडीने करणे बाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश (CBI कोर्ट, पुणे) प्रल्हाद भगुरे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील शाखा अभियंता पोतदार आणि कदम यांनी भेट दिली तसेच जागेची पहाणी केली. लवकरच बांधकाम नकाशा मंजूर करणेसाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी सांगितले.

यावेळी नेहरूनगर येथील जागेची पहाणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुपेकर, बार असोसिएशन अध्यक्ष अॅड सुनिल कडूसकर, अध्यक्ष अॅड. सतिश गोरडे, अध्यक्ष अॅड. किरण पवार, बारचे सेक्रेटरी अॅड. कुंभार, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. आगरवाल, नाझर रावडे भाऊसाहेब आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.