Pimpri : पैशांसाठी केला मित्राचा खून; एचए खूनप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – एचए मैदानावर झालेल्या खून प्रकारणाचा अखेर पिंपरी पोलिसांनी उलगडा केला. पैशांसाठी मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले असून याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

आकाश दिनकर राऊत (वय-२३ रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, अजय राजेश नागोसे (वय-१९, रा.पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, अजय याचा डोक्यात दगड घालून त्याचा खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, सीसीटीव्ही तपासले असता आकाश हा घटनेच्या वेळी अजयसोबत असल्याचे समोर आले. तसेच घटनेनंतर तो फरार होता.

अधिक तपास केला असता आकाश बीड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याला बीडमधून ताब्यात घेतले. अडीच हजार रुपये देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याचा खून करून कचऱ्याच्या सहाय्याने मृतदेह जाळल्याची कबुली आकाश याने दिली. सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.