Pimpri : नागरिकांचे 200 युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करा – अनुप शर्मा

Forgive electricity bills of citizens up to 200 units - Anup Sharma आर्थिक अडचणीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी 200 युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करा

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला, पगार कपात झाली. काम मिळेनासे झाले म्हणून अनेक लोकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. या आर्थिक अडचणीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी 200 युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करावे अशी मागणी आप चे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी केली आहे.

यासंबंधी अनुप शर्मा यांनी पिंपरी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता वायफळकर यांना आज (दि.9) निवेदन दिले आहे.

याप्रसंगी अल्पसंख्याक विंग पुणे जिल्हा अध्यक्ष वहाब शेख, नारंग व डॉ. अमर डोंगरे आदि उपस्तिथ होते.

अनुप शर्मा म्हणाले की, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या सुटल्या, काहीचे व्यवसाय बुडाले. हातावर पोट असणाऱ्या अनेकांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत वीज बील भरणं अनेकांना शक्य होणार नाही. त्यामुळे, ज्यांची  200 युनिट पर्यंतचे वीजबिल आहे ते माफ करावे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकार नागरिकांना कायमस्वरूपी 200 युनिट वीज मोफत देते. महाराष्ट्र सरकारने निदान कोरोना काळात तरी वीजबिलात सवलत द्यावी. अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.