Pimpri: शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांचे आज (गुरुवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 होते. शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे ते सख्खे मेहुणे होत.

भाईजान काझी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सरचिटणीस होते. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त, पुणे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त देखील ते होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे काम होते. महाराष्ट्र राज्य हज यात्रा कमिटीचे मागील 20 वर्षांपासून ते उपाध्यक्ष होते.

मागील तीन दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. ईदगाह मैदान चापेकर चौक चिंचवड येथील दफनभूमीत आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.