Pimpri: माजी नगरसेवक संजय साळवी यांचं निधन

Pimpri: Former corporator Sanjay Salvi passes away संजय साळवी 2002 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक संजय साळवी (वय 47) आज (दि.5) अल्प आजाराने निधन झाले आहे.

संजय साळवी 2002 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मासूळकर कॉलनी, अजमेरा भागाचे त्यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले होते.

त्यांना क्रिकेट खेळण्याचा छंद होता. अल्प आजाराने आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.