Pimpri: माजी उपमहापौर विष्णू कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपमहापौर विष्णू गुलाब कांबळे यांचे नुकेतच वृद्धपकाळाने निधन झाले. ते  78 वर्षांचे होते.  

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले,  तीन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांचे ते वडील होत.

 कांबळे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील  चौबे पिंपरी येथील आहेत.  1943 साली ते नोकरीनिमित्त पिंपरी-चिचंवड शहरात आले. त्यांनी एस के एफ कंपनीमध्ये नोकरी केली. 1986 ते 92 या काळात नगरसेवक म्हणूत ते पिंपरी महापालिकेवर  निवडून आले होते.  महापालिकेत शिक्षण मंडळाचे सदस्य,  गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यकाळात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षाग्रह उभारण्यात आले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.