Pimpri: राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवकांसह कुटुंबीयांना कोरोनाची लागण

Pimpri: Former NCP deputy mayor, current corporators and their families infected with corona शहरातील सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर, माजी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांनाही बाधा झाली आहे. त्यांच्या मुलाचा 13 जुलै रोजी विवाह आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने राजकीय लोकांना देखील विळखा घातला आहे. शहरातील सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

पिंपरी मतदारसंघातील माजी उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाला त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाची तपासणी करुन घेतली. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनाही बाधा झाली आहे.

या माजी उपमहापौरांच्या मुलाचा सोमवारी (दि.13) विवाह आयोजित केला होता. परंतु, मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे विवाह सोहळा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.