Pimpri News : आरपीआयचे माजी शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपाध्यक्ष महादेव कांबळे यांचे अल्पशा आजाराने आज (शुक्रवारी, दि. 11) सकाळी निधन झाले.

महादेव कांबळे यांनी 2015 ते 2020 या कालावधीत आरपीआय पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. दलित पँथर संघटनेपासून त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरु होता. त्यानंतर त्यांनी आरपीआयमध्ये देखील सक्रिय काम केले.

शुक्रवारी सकाळी अचानक शारीरिक व्याधी होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.