Pimpri : दुचाकीचोरांचा सुळसुळाट; चार वाहनचोरीच्या घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये चार वाहन चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली. काही दिवसांची विश्रांती घेल्यानंतर वाहनचोर पुन्हा वाहने चोरण्याचा सपाटा लावत आहेत. घरासमोर, कार्यालयासमोर आणि रस्त्याच्या बाजूला लावलेली वाहने चोरून नेली जात आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लालटोपीनगर मोरवाडी येथे नाज बेकरीजवळ लावलेली 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 14 / एम एल 3142) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी कृष्णा बसराज कोलोळु (वय 30) यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. सनी समशेरसिंग डोकवाल (वय 29, रा. दत्तनगर, दिघी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांनी त्यांची 17 हजार रुपये किमतीची दुचाकी रामनगर बोपखेल येथे म्हशीच्या गोठ्याजवळ शुक्रवारी (दि. 30) पार्क करून ठेवली. अज्ञात चोरटयांनी सनी यांची दुचाकी चोरून नेली.

तळेगाव दाभाडे येथे मामासाहेब खांडगे आर्केड बस डेपो जवळ पार्क केलेली 30 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 31) सकाळी साडेदहा ते रात्री आठ या कालावधीत घडली. याप्रकरणी गणेश आत्माराम वाडेकर (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तळेगाव दाभाडे येथील ट्रेडर्स दुकानासमोर पार्क केलेली 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / बी डब्ल्यू 1993) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 31) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सतीश शशिकांत खोडे (वय 37, रा. पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like