Pimpri : एकाच दिवसात शहरातील चार सराईत गुन्हेगार तडीपार

पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांची कारवाई

एमपीसी न्यूज – अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी ही कारवाई केली.

दीपक शहाजी रिठे (वय 22, रा. सोमेश्‍वर मंदिराजवळ, मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी), अक्षय मुकुंद गायकवाड (वय 23, रा. अंकुश आनंद हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी), अमर जितेंद्र कसबे (वय 24, रा. गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी, दळवीनगर, ओटास्कीम, निगडी) हे तीनही सराईत गुन्हेगार निगडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या तिघांनाही संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

शाहरुख रफिक शेख (वय 22, रा. गणपती मंदिराजवळ, आदर्शनगर, मोशी) हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला एक वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालय कार्यान्वित झाल्यापासून परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी आत्तापर्यंत 20 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.