Pimpri : चारसदस्यीय प्रभाग पद्धत भाजपसाठी अनुकूल

एमपीसी न्यूज – तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा (Pimpri) तीन सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक घेण्याचा निर्णय महायुती सरकारने बदलला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय भाजपसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017 मध्ये 32 प्रभाग होते. त्यानुसार 128 नगरसेवक जनतेतून निवडून येतात. चार सदस्यीय पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपचे तब्बल 77 नगरसेवक निवडून आले होते. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, एकत्रित शिवसेनेचे 9, अपक्ष पाच , मनसे एक असे संख्याबळ होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 54 नगरसेवक असून भाजपचे 35, राष्ट्रवादी 9, एकत्रित शिवसेना 6, अपक्ष चार, पिंपरी विधानसभा मतदार संघात 26 नगरसेवक असून भाजप दहा, राष्ट्रवादी 13, शिवसेना 3 , तर भोसरी विधानसभा मतदारसंघात 48 नगरसेवक असून भाजप 32 , राष्ट्रवादी 14 अपक्ष 1 आणि 1 एक असे राजकीय पक्षानुसार नगरसेवक निवडून आले होते. भाजपची एकहाती सत्ता आली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष होता. वेळेत निवडणूक होऊ शकली नसल्याने महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे.

Pimpri : कष्टकरी संघर्ष महासंघाच्या महामोर्चाला यश, राज्यातील असंघटीत कामगारांची लवकरच होणार नोंदणी

महायुती सरकारने महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णयामुळे शहरातील शहरातील प्रभागांची संख्या एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग ही रचना सत्ताधारी भारतीय जनता (Pimpri) पक्षासाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेबरोबरच प्रभागाच्या सीमा आणि परिक्षेत्रात येणाऱ्या लोकांची समाजवैशिष्ट्ये निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत असल्याने भाजपला त्याचा लाभ उठविणे शक्य आहे. चार नगरसेवकांमुळे प्रभागाचा भौगोलिक आकार वाढत असल्याने मतदारही वाढत असल्याने भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यताही वाढीस लागणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले आहे. तर, शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळाले असून त्यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव मिळाले आहे. राष्ट्रवादीची ताकद दोन्ही गटात विभागली आहे. तर, शिवसेनेचेही दोन गट झाले आहेत. मूळ शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना हे पक्ष नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले आहे. मुळातच शहरात शिवसेनेची ताकद नगण्य होती. आता ती ताकद दोन गटात विभागली आहे. काँग्रेसचा मागील सभागृहात एकही नगरसेवक नव्हता. मनसेचा एक नगरसेवक होता. राज्यस्तरवरील दोन पक्षांची शकले झाली आहेत. कार्यकर्त्यांना चारच्या प्रभागात लढणे आव्हानात्मक असणार आहे. चार नगरसेवकांमुळे प्रभागाचा भौगोलिक आकार वाढत असल्याने मतदारही वाढत असल्याने भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यताही वाढीस लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.