BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पूर्ववैमनस्यातून चौघांनी तरुणाचा डोळा फोडला; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. ही घटना संत तुकाराम नगर येथे घडली.

तौसिफ़ इकबाल खान (वय 28, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहित मोटे (वय 19, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ़ आणि रोहित यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून रोहित याने त्याच्या तीन साथीदारांसह येऊन तौसिफ़ यांच्या वाहनाला वाहन आडवे लावले. त्यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला.

यातूनच रोहित आणि त्याच्या साथीदारांनी तौसिफ़ याना चामडी बेल्टने मारहाण केली. यामध्ये तौसिफ़ यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डावा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2