Pimpri: चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघीतील चार पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; पाच रुग्ण कोरोनामुक्त

रहाटणी, आनंदनगरमधील 'हा' परिसर सील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघीतील चार पुरुषांचे रिपोर्ट आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सकाळी रहाटणी परिसरातील पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात नवीन पाच रुग्णांची भर पडली आहे. तर, आज दिवसभरात पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी गेले आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार,  महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे सायंकाळी रिपोर्ट आले आहेत.

त्यामध्ये चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघीतील चार पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. 52, 60, 65 आणि 70 वर्षीय चार पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर, पिंपरीवाघेरे,  पिंपळेगुरव,  मोशीतील पाच रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी महापालिका रुग्णालयात 54 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील अशा 198 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील 5 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 116 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

# दाखल झालेले संशयित रुग्ण – 53

# पॉझिटीव्ह रुग्ण – 05

# निगेटीव्ह रुग्ण – 97

# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 81

# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 136

# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 99

# आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 198

#  सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 54

# शहरातील कोरोना बाधित पाच रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  9

# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 116

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 18313

# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 52771

रहाटणी, आनंदनगरमधील ‘हा’ परिसर सील !
रहाटणी, आनंदनगरमध्ये आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रहाटणीतील (श्रीनंदा क्लासिक सिद्धीविनायक मंदिर-रेणुका माता मंदिर-बसेरा रेसिडन्सी-ओम मेडिकल स्टोअर-जीवन क्लिनीक-छत्रपती चौक), आनंदनगर चिंचवड स्टेशन येथील (चिंचवड स्टेशन रोड-स्टार बेस्ट बेकरी-जुना मुंबई पुणे हायवे-सद््गुरु स्नॅक्स-कार्निव्हल सिनेमा मागची बाजू-प्रिमियर कंपनी मागील बाजू-मालधक्का भिंत-मालधक्का रोड) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.