Pimpri: चिंचवड, भोसरी, चिखलीमधून चार दुचाकी चोरीला

Pimpri: Four two-wheelers stolen from Chinchwad, Bhosari, Chikhali चाकणमध्ये पाईपलाईनवरील लोखंडी झाकण चोरीला गेले आहे.

एमपीसी न्यूज- चिंचवड, भोसरी आणि चिखली परिसरातून चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि.23) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीची पहिली घटना शाहूनगर, चिंचवड येथे 23 जून रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत दीपक देवराम चौधरी (वय 25, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 ईएल 1959) ही दुचाकी राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये 22 जून रोजी रात्री पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना साईराम कॉलनी, दगडोबा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे 19 जून रोजी उघडकीस आली. केशव धर्मा पवार (वय 43, रा. साईराम कॉलनी, दगडोबा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 सीएन 8839) राहत्या घरासमोर 18 जून रोजी रात्री पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची तिसरी घटना पीएमटी बस थांबा जवळ भोसरी येथे घडली. याबाबत पोपटराव कुशाबराव शिंदे (वय 43, रा. मांजरी रोड, हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी येथील पीएमटी बस थांब्याजवळ 26 मे रोजी रात्री दहा वाजता लॉककरून पार्क केली होती. त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लगेच सव्वा अकरा वाजता उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची चौथी घटना चिखली येथे उघडकीस आली. याबाबत संदीप कमलाकर बिलादार (वय 32, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांची दुचाकी 16 मे रोजी सकाळी दहा वाजता चिखली येथील सुखसागर स्वीटच्या दुकानासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

चाकणमध्ये पाईपलाईनवरील लोखंडी झाकड चोरीला

चाकणमध्ये पाईपलाईनवरील लोखंडी झाकण चोरीला गेले आहे. ही घटना चाकण जवळ करंजविहीरे येथे 22 जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत शिवमूर्ती गौरीशंकर पांडे (वय 32, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंज विहीरे गावात तुळजा पेट्रोलपंप टे राईस मिल दरम्यान असलेल्या पाईपलाईनवरील झिरो वेलो सिटी वॉलचे 50 हजार रुपये किमतीचे लोखंडी झाकण अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.