Pimpri: पिंपरी, भोसरी, चाकण, देहूरोड परिसरात चोरीचे चार प्रकार; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Pimpri: Four types of theft in Pimpri, Bhosari, Chakan, Dehuroad area; stolen Rs 6.5 lakh दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोयंडा कापून घरात प्रवेश केला.

एमपीसी न्यूज- पिंपरी, भोसरी आणि चाकण परिसरात घरफोडीचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे येथे एका वर्कशॉपचा पत्रा उचकटून चोरी केली आहे. या चार प्रकारांमध्ये एकूण सहा लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

घरफोडीचा पहिला प्रकार 1 एप्रिल ते 8 मे दरम्यान पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडला. जयश्री रघुवीर मुलगे (वय 39, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे घर 1 एप्रिल ते 8 मे या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोयंडा कापून घरात प्रवेश केला. एक सोनसाखळी, दोन कर्णफुले, एक सोन्याची नथ, चांदीच्या जोडव्यांचे तीन जोड व सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 70 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

घरोफोडीचा दुसरा प्रकार 18 जानेवारी ते 8 जून या कालावधीत नाणेकरवाडी येथे मिंडा कार्पोरेशन एसएसडी व्हिजन या कंपनीत घडली. रवींद्र दत्तात्रय जगदाळे (वय 38, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाणेकरवाडी येथील मिंडा कार्पोरेशन एसएसडी व्हिजन या कंपनीत नोकरी करतात. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कंपनीमधून दोन लाख 99 हजार रुपये किमतीचे कॉपर मुविंग पार्ट चोरून नेले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

घरफोडीचा तिसरा प्रकार 18 ते 19 फेब्रुवारी दरम्यान दापोडी येथे घडला. आरोही रवींद्र दाभणे (वय 25, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एक तोळा पाच ग्रॅमची सोनसाखळी, एक ग्रॅमचे पेंडेन असे एक तोळा सहा ग्रॅमचे 47 हजार रुपये किमतीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

चौथा प्रकार शेलार वस्ती, तळवडे येथे 9 ते 10 जून या कालावधीत घडला. राम अर्जुन कदम (वय 38, रा. पर्वती दर्शन, मित्र मंडळ कॉलनी, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे तळवडे येथील शेलार वस्तीत क्रिएटिव्ह अॅग्रो इंजिनियरिंग वर्क नावाचे वर्कशॉप आहे. अज्ञात चोरट्यांनी वर्कशॉप समोर ठेवलेला शाफ्ट, होल्डर, पीन, फीड पाईप, मशीन व वेल्डिंग केबल, लोखंडी बार, पार्टिंग सर्कल असे एकूण सव्वादोन लाखांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.