Pimpri : फौरेशिया कंपनीची वायसीएम रुग्णालयाला 2 लाख 80 हजारांच्या वैद्यकीय साहित्याची मदत

Fouresia Company donates 2 lakh 80 thousand medical supplies to YCM Hospital

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून भोसरी येथील फौरेशिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला 2 लाख 80 हजार रुपयांच्या वैद्यकिय वस्तूंचे वाटप केले.
.
या साहित्यामध्ये 12 स्ट्रेचर ट्रॉली, 5 स्पेशल स्ट्रेचर ट्रॉली व 2 व्हीलचेअरचा समावेश आहे. ‘सीएसआर’च्या माध्यमातून ही मदत करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नगरसदस्या सुलक्षणा धर, कंपनीचे संचालक विनायक शेंडकर, प्रशासकिय व्यवस्थापक जितेंद्र निखळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.