Pimpri : लायन्स क्लब तर्फे आर्सेनिक गोळ्या व मास्कचे मोफत वाटप

Free distribution of arsenic pills and masks by the Lions Club : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला

एमपीसी न्यूज – लायन्स क्लबच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या वतीने होमीयोपेथी आर्सेनिक अल्बम 30 तसेच मास्कचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.‌ त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या व फेस मास्कचे वाटप लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या वतीने करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणी हे वाटप करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, सचिव रोहित गुप्ता, कोषाध्यक्ष अशोक बंसल, प्रसिद्धी प्रमुख रवि सातपुते, सल्लागार समिती अध्यक्ष अशोक अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.