Pimpri: कर्मचारी महासंघातर्फे 123 वाहनचालकांची मोफत नेत्र तपासणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ, शेल आणि व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 123 वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच चष्मे वाटप करण्यात आले.

महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारी महासंघ कार्यालयात गुरुवारी (दि. 20) रोजी झाले. महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षीपासून शेल व व्हिजन स्प्रिंग यांनी वाहनचालक यांचेकरीता महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन केलेले आहे. शेल आणि व्हिजन स्प्रिंग यांनी शेल संस्थेमार्फत “SAFE DRIVE INDIA” या उपक्रमांतर्गत आयोजित केलेला आहे. या उपक्रमाचा लाभ साधारण दोन लाखांहुन अधिक वाहनचालकांनी घेतला आहे.

महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या कल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये प्रथमच अशा स्वरुपाच्या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये एकूण 123 वाहनचालक कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला असून असा उपक्रम किमान वर्षातुन एकदा घेण्याची मागणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.