Pimpri: ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही’ अशी धमकी देत मित्राने पळविला तरुणीचा मोबाइल

Pimpri: Friend snatches young woman's mobile phone तू माझ्यासोबत बोलत नाही म्हणून मी आत्महत्या करीन, तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही

एमपीसी न्यूज – अनोळखी क्रमांकावरून फोन करून आत्महत्येची धमकी देऊन मित्राने तरुणीचा पाठलाग केला. माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचा मोबाइल फोन घेऊन निघून गेला. हा प्रकार पिंपरी येथे 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2020 दरम्यान घडला.

याप्रकरणी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.2) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश राजू दिवर (वय 21, रा. कैलास नगर, पिंपरी) याच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांना पाठलाग करून त्रास देत होता. दररोज फिर्यादीच्या कंपनी बाहेर थांबून व अनोळखी फोनवरून फोन करायचा. ‘तू माझ्यासोबत बोलत नाही म्हणून मी आत्महत्या करीन, तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही’, अशी धमकी तरुणाने फिर्यादी यांना दिली.

आरोपी याने शनिवारी (दि.1) फिर्यादी यांना त्याच्या गाडीवरून नेले. पिंपरी येथील डेअरी फार्म रोड जवळ फिर्यादी यांना उतरून शिवीगाळ केली. तसेच मारण्यासाठी हात उगारून फिर्यादी यांच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन जबरदस्तीने घेऊन निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.