Pimpri : महापौर उषा ढोरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

देशातील लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. तसेच लोकांनीसुद्धा कुठेही गर्दी न करता घरीच जयंती साजरी करण्याचे आवाहन उषा ढोरे यांनी केले आहे. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,  माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.