Pimpri : विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन केले सामाजिक कार्य

एमपीसी न्यूज – वाढदिवस म्हटले की केक, पार्टी, फिरायला जाणे असे आजच्या तरुणाईंचे समीकरणच बनलेले असते. मात्र, या सा-या अनावश्यक गोष्टींना फाटा देत संत तुकारामनगर येथील युवा व्यवसायिक विशाल जाधव यांनी गोरगरीब रुग्णांना, गरजूंना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि लहान मुलांना खाऊ वाटप केले.

याबाबतीत युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे म्हणाले की, जीवनात अनेक लोकांना एक वेळचा आनंद देखील भेटत नाही. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच माझी तरुणाईला आवाहन आहे की, आपणच उद्याचे भविष्य आहात. सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसाच्या अनावश्‍यक खर्च टाळून अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालय, दुष्काळग्रस्त, शेतकरी, शाळा, अंध, दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा. जेणेकरून आपण सामाजिक भान जपण्याचे महान कार्य हातून घडेल.

  • सध्या सगळीकडेच चौका-चौकात तरुण मुंल आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसतात. यामध्ये 500 रुपयांचा केक आणून तो कापतात आणि तो केक कापून तोंडाला फासतात. यामध्ये एकच गोष्ट होती ती आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी. विशाल जाधव याने जितेंद्र ननावरे यांच्या सांगण्यावरुन गोरगरीब रुग्णांना गरजूंना मदत करण्याचे ठरवले. आणि सामाजिक भान जपण्यांचे काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.