BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार

राज्यस्तरीय गदिमा जन्मशताब्दी सोहळा; भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटयगृहात मंगळवारी होणार वितरण

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने राज्यस्तरीय गदिमा जन्मशताब्दी सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळयानिमित्त गदिमा साहित्य पुरस्कारा प्रदान करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटयगृहात मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता हा गदिमा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.कार्यक्रमाचे उदघाटन अ.भा.म.सा. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे.

  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील असणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहूल जाधव असणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल म्हणून एमजेएफ ला. ओमप्रकाश पेठे असणार आहेत. तर गदिमांची नात लीनता माडगुळकर यांची उपस्थिती असणार आहेत. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी सुदाम भोरे उपस्थित असणार आहे.

गदिमा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री स्मिता तांबे, गदिमा लोककला पुरस्कार लोककलेच्या उपासक प्रमिला सूर्यवंशी, गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार गझलकार नितीन देशमुख यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच गदिमा संस्कारक्षम शाळा सन्मानमध्ये क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे खिंवसरा पाटील विद्यामंदिर, आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार चाकण येथील असेंटचे डायरेक्टर दत्तात्रय दगडे व डायरेक्टर चंद्रकांत रासकर यांना देण्यात येणार आहे.

  • गदिमा साहित्य पुरस्कारात सुनील यावलीकर, मानसी चिटणीस, किशोर मंदाबाई दत्तात्रय मुगल, संदीप वाघोले यांनाही प्रदान करण्यात येणार आहे. मृत्युंजय साहित्य पुरस्कारात सोलापूरचे सुनील जवंजाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
HB_POST_END_FTR-A2

.