Pimpri : महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी गणेश बाबर; सचिवपदी प्रकाश यादव 

Pimpri: Ganesh Babar appointed as West Maharashtra Youth President of Maharashtra State Agricultural Graduates Association; Prakash Yadav as Secretary

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी गणेश बाबर तर, सचिवपदी प्रकाश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर असोसिएशन  सचिवपदी मूळचे वाई येथील रहिवासी असणारे व सामाजिक कार्यात सहभागी असणारे प्रकाश यादव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी गणेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. या पदभार निवडीबद्दल सविस्तर माहिती कृषि पदवीधर संघटना अध्यक्ष महेश कडूस पाटील यांनी दिली.

गणेश बाबर हे वाई तालुक्यातील किकली गावचे सुपुत्र असून ते अभियंता आहेत. यादव आणि बाबर हे पश्चिम महाराष्ट्रातील विविध संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होत असतात. कृषी संघटना 2012 पासून सम्पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक उपक्रम, जन आंदोलने करत असते. शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्यासाठी ही संघटना काम करीत असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.