BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : गणेशोत्सव शांतता बैठक मंगळवारी

एमपीसी न्यूज – यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (मंगळवारी) शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होईल. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षस्थानी असतील. खासदार डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या बैठकीस शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ, पदाधिकारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभागी होऊन आपल्या सूचना मांडाव्यात असे आवाहन महापौर जाधव यांनी केले आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3