Pimpri : पिंपरीमधील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; सायंकाळी साडेसहापर्यंत 30 मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. लिंक रोड चिंचवड येथील या मंडळाने दुपारी सव्वाबारा वाजता पहिले विसर्जन केले. यानंतर सायंकाळी साडेसहापर्यंत 30 मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, तसेच डीजेच्या तालावर मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.

एलप्रो वर्कर्स, ब्ल्यू स्टार मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, शिवशंकर मित्र मंडळ, दुर्गादेवी तरुण मंडळ, झुलेलाल मित्र मंडळ, माईंड स्पेस हॉटेल पिंपरी, जय भारत तरुण मंडळ, पवन मित्र मंडळ, फाईव्ह स्टार तरुण मंडळ, बाल मित्र मंडळ, सदानंद तरुण मित्र मंडळ, एस पी फायनान्स, कलश मित्र मंडळ, जय भारत तरुण मंडळ, कोहिनुर मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ पिंपरी, श्री गणेश मित्र मंडळ नेहरूनगर, श्री जयसिंग मित्र मंडळ, श्री प्रेमप्रकाश मित्र मंडळ, पुणे हॉकर्स पंचायत भाजी मंडई, गुप्ता मित्र मंडळ, संग्राम मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, गणराज तरुण मंडळ, सनशाईन मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, न्यु जैत्य मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ आदी मंडळांनी सायंकाळी साडेसहा पर्यंत विसर्जन केले.

पिंपरीमधून पवना नदी वाहते. या नदीवर पिंपरी स्मशानभूमी घाट आणि सुभाष नगर घाट हे दोन विसर्जन घाट आहेत. या दोन्ही घाटांवर अग्निशमन विभागाचे जवान तैनात झाले आहेत. शहरात एकूण 8 अग्निशमन अधिकारी, 55 अग्निशमन जवान, 9 जीवरक्षक, 25 प्रशिक्षणार्थी अधिकारी असा फौजफाटा अग्निशमन विभागाकडून सर्व घाटांवर तैनात करण्यात आला आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी 3 हजार 189 पोलिसांचा बंदोबस्त पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्था राखून शांततेत गणेश विसर्जन करण्यात येत आहे.

पोलीस मित्र, समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी असे सुमारे 750 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी मोबाईल व्हॅन गस्त घालत आहेत. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके देखील तैनात केली आहेत. त्याद्वारे सोनसाखळी चोरटे, पाकीटमार, बॅग पळवणा-यांवर लक्ष ठेवले जात आहे. महिला छेडछाड करणा-या भामट्यांवर देखील पोलीस लक्ष ठेऊन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.