Pimpri: बाप्पा! राजकीय नेत्यांच्या घरचा !

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे लाडके दैवत असणा-या गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तसेच शहरातील राजकीय नेत्यांच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचे आगमन झाले आहे. राजकीय नेत्यांच्या घरच्या बाप्पांची क्षणचित्रे…

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या थेरगाव येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. आकर्षक मखरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. रंगबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आरतीच्या वेळी खासदार श्रीरंग बारणे, त्यांच्या पत्नी सरिता बारणे, मुलगा प्रताप बारणे, विश्वजीत बारणे, स्नुषा स्नेहा बारणे उपस्थित होते.

घरातील श्री गणेश मूर्ती सोबत खासदार श्रीरंग बारणे आणि त्यांचे कुटुंबीय
खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरचा गणपती

आमदार महेशदादा लाडगे यांच्या भोसरी येथील निवासस्थानी बाप्पा भव्य सिंहासनावर आरुढ झाले आहेत. बाप्पाची मनोभावे सेवा करताना आमदार महेश लांडगे.

श्रींची प्रतिष्ठापना करताना आमदार महेश लांडगे
आमदार महेश लांडगे यांच्या घराचा गणपती

विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पिंपळे सौदागर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. शंखधारी बाप्पांना पगडी आणि उपरण्याचा पेहराव घालण्यात आला आहे.

शिवसेना गटनेते राहुल (दादा) कलाटे यांच्या वाकड येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाची आरती करताना कलाटे कुटुंबीय

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या घरचा गणपती

अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे यांच्या थेरगाव येथील निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले आहे. आकर्षक मखरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बाप्पांचे दर्शन घेताना कैलास बारणे आणि त्यांच्या पत्नी मेघा बारणे.

अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे यांच्या घरचा गणपती

महापुराच्या व मंदीच्या संकटांतून कोल्हापूर सावरु दे, बाप्पा चरणी प्रार्थना – आमदार सतेज पाटील
यावेळी महापुराच्या व मंदीच्या संकटातून कोल्हापूर सावरू दे व पुन्हा उभारी घेऊ दे अशी प्रार्थना विघ्नहर्त्याकडे केली. नवं कोल्हापूर उभारण्यासाठीच बळ आम्हाला मिळू दे, या निश्चयामध्ये जितका जास्त सहभाग घेता येईल तितका घेता येऊ दे, अशी प्रार्थना  आमदार सतेज पाटील व त्यांचे  चिरंजीव ऋतुराजने गणरायाकडे केली.

…………..

महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या संभाजीनगर येथील समृद्धी या निवासस्थानी मोठ्या उत्साहाता बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पवार यांच्या पत्नी ललिता पवार, कन्या ऐश्वर्या पवार, बंधू मोतीराम पवार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.