_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri News: कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी गणेशमंडळांनी स्वयंसेवक द्यावेत – आयुक्तांचे आवाहन

लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच शोधून चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. : Ganesh Mandals should provide volunteers for contact tracing - Commissioner's appeal

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोनाग्रस्त 80 टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये राहून दहा दिवसानंतर ते घरी जावू शकतात. मात्र, लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच शोधून चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये काम करण्यासाठी गणेश मंडळांनी पालिकेला स्वयंसेवक द्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

स्वयंसेवकांच्या माध्यमातून पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्यांचा सर्व्हे केला जाईल. लक्षणे असलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत देता येईल.

वेळीच मदत मिळाल्यास प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवू शकतो, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले. सर्वांचे सहकार्य मिळाल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, श्रावण महिना अर्धा संपत आला आहे. आत्तापर्यंत सर्व सण घरात राहून साजरे केले आहेत. त्यातून जबाबदारीची जाणीव पुढे आली आहे. यापुढेही ती राखावी.

दहीहंडी समोर आहे. त्यानंतर गणेशोत्सव आहे. सर्वांचे आद्यदैवत बाप्पाचे आगमन दरवर्षीच्या उत्साहात यंदा करता येणे शक्य नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी.

गणेश चतुर्थीदिवशी वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ अनेक उपक्रम राबवत असतात. यावर्षी घरात राहून भक्तीभावाने श्री गणेशाचे पूजन करायचे आहे. सार्वजनिक गणोशोत्सवावर निर्बंध आहेत.

घरातील गणपतीचे घरातच विर्सजन करावे. भक्तीला कुठलीही मूरड घालायची नाही. आपल्या भक्तीमुळे उत्साहाच्या वातावरणावर विरजन पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्येकाने स्वयंप्रेरने बंधने घालावीत. पालिकेने यंदा ऑनलाईन पद्धतीने अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली. त्याचपद्धतीने शहरातील गणेश मंडळांनी आपले कार्यक्रम, आरती ऑनलाईन पद्धतीने करावी. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जाणार आहे.

कोरोना स्वत:हून पसरत नाही. त्याला आपण पसरवतो. तो पसरायचा थांबला तर तो मरणार आहे. आपल्याला हा प्रसारच रोखायचा आहे. यासाठी काही निर्बंध स्वत:वर घालावेत असे सांगत आयुक्त म्हणाले, कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये काम करण्यासाठी गणेश मंडळांनी स्वयंसेवक द्यावेत.

त्यांच्या माध्यमातून पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्यांचा सर्व्हे करण्यात येईल. त्यांचे दैनंदिन दिवसातून दोनवेळेला मॉनिटेरिंग करु शकतो. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देता येईल.

वेळीच मदत मिळाल्यास प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवू शकतो. मात्र, वेळीच निदान झाले नाही. अंगावर आजार काढला आणि आयत्यावेळेला पुढे आले.

तसेच श्वास घेण्याचा त्रास, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्णालयात आल्यास अशावेळी कदाचित वैद्यकीय यंत्रणा देखील कमी पडू शकते. ही वेळच येवू द्यायची नाही.

त्यासाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून कोरोनाचा पाठलाग करुन, लक्षणे असलेल्यांचा शोध घेवून, त्यांना वेळीच उपचार द्यायचे आहेत.

शहरातील कोरोनाग्रस्त 80 टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये राहून दहा दिवसानंतर ते घरी जावू शकतात. मात्र, लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच आणि चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे.

गणेश मंडळाचे कार्यकर्ते आपल्या आवाहानाला साद देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर्षी गणेश मंडळांनी स्वयंसेवी कार्याची स्पर्धा घेवू, कोण अधिक काम करते. याची चूरस निर्माण करावी, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.