Pimpri: गणेशोत्सव शांतता बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, आयुक्तांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज – यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (मंगळवारी) आयोजित केलेल्या बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त या प्रमुख पदाधिकारी, अधिका-यांयांनी पाठ फिरविली. उपमहापौर, महापालिका आयुक्त महापालिका मुख्यालयात असताना त्यांनी शांतता बैठकीला दांडी मारली.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये आज महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागात मदतीसाठी जाधव गेले आहेत. त्यामुळे ते बैठकीला हजर नव्हते. परंतु, खासदार, आमदार, उपमहापौर, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांनी देखील बैठकीकडे पाठ फिरविली.

  • उपमहापौर सचिन चिंचवडे महापालिकेतील दालनात उपस्थित होते. महापौर शहरात नसल्याने त्यांनी बैठकीला जाणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी बैठकीला न जाता महापालिकेतील दालनात बसणे पसंत केले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील बैठकीला जाणे टाळले.

तर, प्रदिर्घ रजेवरुन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन हे आज शहरात दाखल झाले आहेत. परंतु, त्यांनी देखील बैठकीकडे पाठ फिरविली. प्रमुख अधिका-यांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.