Pimpri: राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षपदी गंगा धेंडे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षपदी गंगा धेंडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते धेंडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

मुंबई येथील पक्ष कार्यालयात पाटील यांनी धेंडे यांची निवड केल्याचे जाहीर केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड उपस्थित होते.

गंगा धेंडे यांना 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.