Pimpri : पुस्तकांच्या गावात रंगला साहित्यिकांचा मेळावा

एमपीसी न्यूज – “आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने,” अशा भावनेतून वाचन चळवळ समृद्ध करणारे महाबळेश्वर जवळील भिलार हे निसर्गसंपन्न असे       ” पुस्तकांचे गाव ” पिंपरी चिंचवड साहित्य मंचच्यावतीने पिंपरी चिंचवड मधील 40 साहित्यिकांची वाचन जागृतीच्या निश्चयाने भारतातील या पहिल्या पुस्तकांच्या गावी नुकतीच एक सफर काढण्यात आली.

साहित्यिकांनी विविध विषयांवरील पिंपरी चिंचवड मधील लेखक ,कवींची 70 पुस्तके या प्रकल्पासाठी भेट दिली. शासनाचा पुढाकार व गावाच्या सहभागातून समर्पक भित्तीचित्रांनी सजलेल्या 30 पुस्तकघरात जाऊन बालसाहित्य, लोकसाहित्य,संतसाहित्य अशा विविध 30 रूढ आणि  वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकारांच्या वाचनाचा आनंद साहित्यिकांनी यावेळी लुटला.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या  खुल्या प्रेक्षागृहात कथाकथन,अनुभव कथन,विचारमंथन व कवीसंमेलन असा आनंदमेळा रंगला.व पिंपरी चिंचवड परिसरातही पुस्तकांच्या या गावाचा आदर्श घेऊन लोकसहभागातून वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी वाचन चळवळ उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.व वाचन संस्कृतीचे नवे पर्व या निमित्ताने सुरू व्हावे व त्यासाठी परिसरातील सर्व थरातील व्यक्ती,शाळा, महाविद्यालये आणि संस्थांनी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांसाठी एक छोटेखानी सभागृह तसेच स्थानिक साहित्यिकांच्या पुस्तकांच्या 100 प्रती महापालिकेने खरेदी कराव्या असा ठराव मांडण्यात आला. या साहित्यसफरीचे आयोजन राज अहेरराव, राजेंद्र घावटे,सुरेश कंक,सुहास घुमरे ,नितीन हिरवे या जेष्ठ साहित्यिकांनी केले. धावत्या बस मध्ये अभिनव पद्धतीने प्रकाशक नीता नितीन हिरवे (संवेदना प्रकाशन चिंचवड) यांनी केलेल्या २पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले . गजानन वसंत माद्यसवार लिखित “अंधारल्या वस्तीतील सूर्य “या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. महादेव रोकडे यांच्या हस्ते.व प्रा.डॉ. विद्याधर बनसोड लिखित”दलित साहित्याचे वैचारिक अधिष्ठान” या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील व “शब्द’ ग्रुप चे संजय सिंगलवार यांचे हस्ते झाले. यामध्ये  सविता इंगळे, शोभा जोशी, माधुरी विधाटे, नंदकुमार मुरडे, सुभाष चव्हाण अशोक कोठारी,सुहास पोफळे,जयश्री घावटे,,बाबू डिसूझा,मीरा कंक ,सुप्रिया सोळांकुरे,संपत शिंदे, ज्योती देशमुख इत्यादी 40 साहित्यिक आणि साहित्य रसिक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.