Pimpri : अॅड. गौतम चाबुकस्वार यांना 70-80 हजार मतांच्या फरकाने निवडून आणू -चंद्रकांता सोनकांबळे

एमपीसी न्यूज- महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना पिंपरी मतदारसंघातून 70-80 हजार मतांच्या फरकाने निवडून आणू असा निर्धार आरपीआयच्या नेत्यां चंद्रकांता सोनकांबळे यांनी व्यक्त केला आहे.

युवासेना पिंपरी विधानसभा व आरपीआय युवक आघाडी यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला पिंपरी विधानसभा अध्यक्ष केतन कांबळे, आर पी. आय युवक, युवती अधिकारी प्रतिक्षा घुले, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष आकाश सोनवणे, सागर ससाणे, विभागसंघटक निलेश हाके, संदीप तोरणे, विकास गायकवाड, रवी नगरकर उपस्थित होते.

चंद्रकांता सोनकांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून निवडणूक विषयक सूचना केल्या. महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युवासैनिक आणि आरपीआयच्या युवकांनी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करून प्रचाराचा वेग वाढवा, घरोघरी जाऊन आपल्या उमेदवारने केल्याल्या कामाचा लेखाजोखा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवा असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.