Pimpri: गेंदीबाई चोपडा हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – टेल्को रोड, चिंचवडस्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या 1998 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षांनंतर भेट झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

या स्नेहमेळाव्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य जिल्ह्यात स्थायिक विद्यार्थीं, विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक घनश्याम कांबळे, सुभाष देवकाते, दिनकर नाकाडे, गंगाधर शिरसाट, काशिनाथ सदाफुले, मधुबाला पटवा, हलिमा शिकलकर, लोहार आदींसह सर्व शिक्षक यावेळी आवर्जुन उपस्थित होते. घनश्याम कांबळे म्हणाले, गेंदीबाई चोपडा हायस्कुलमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

या शाळेने येथील प्रत्येक विद्यार्थ्यांवर संस्कार केले आहेत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी कधीही भरकटला नाही, याचा सार्थ अभिमान आहे, असेही ते म्हणाले. स्नेहमेळाव्यातील विद्यार्थ्यांकडून पाणी फाउंडेशनसाठी अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील काही आठवणींना उजाळा दिला. सर्व शिक्षकांसमवेत केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शाल, श्रीफळ, रोप देऊन सन्मानित केले. गजानन इनामदार यांनी प्रास्ताविक केले. विद्या चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. विकास यादव यांनी आभार मानले. अदीथ गुजरे, अमोल कोरे, गणेश गोसावी, रवींद्र गारगोटे, शीतल भोईटे आदींनी संयोजनासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.