_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri:  महासभेत कोरोना योद्धांच्या अभिनंदनाचा ठराव

General Assembly congratulates Corona Warriors

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रोखण्यासाठी महापालिका डाॅक्टर, नर्स, वैद्यकीय, आरोग्य कर्मचारी, पोलीस जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत. या कोरोना योद्धांचे महापालिका सर्वसाधारण सभेत आज (सोमवारी)  अभिनंदन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.  सुरक्षित अंतर राखण्यासाठी  चार व्यक्तींच्या आसन असलेल्या सोफ्यावर केवळ दोनच सदस्यांची व्यवस्था केलेली आहे. सदस्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची व्यवस्था केली आहे.

पक्षनेते नामदेव ढाके यांनी कोरोना योद्धांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यात केशव घोळवे, उषा मुंडे, झामाबाई बारणे, संतोष लोंढे, राजू बनसोडे, संगीता ताम्हाणे, अंबरनाथ कांबळे, संदीप वाघेरे, हर्षल ढोरे, राजेंद्र गावडे आदींनी सहभाग घेतला.

कोण काय म्हणाले

– अजित गव्हाणे : कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी खासगी लॅबची मदत घ्यावी.

– सुजाता पलांडे : वायसीएम व भोसरी रुग्णालयांतील डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचा-यांप्रमाणे सर्वच दवाखाने, रुग्णालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सवलती द्याव्यात.

दत्ता साने : गरिबांसाठी कम्युनिटी किचन पुन्हा सुरू करावेत.

_MPC_DIR_MPU_II

– राहुल जाधव : कामगार, कष्टकऱ्यांना व शिधापत्रिका नसणा-यांना अन्नधान्य किट द्यावे.

मंगला कदम : कंटेन्मेंट झोनचे क्षेत्र कमी करा.

योगेश बहल: कंटेन्मेंट झोनचे क्षेत्र कमी करावे.

एकनाथ पवार : टीमने चांगले नियम केले, कोरोना आटोक्यात आणायचे काम प्रशासनाने केले आहे.

राहुल कलाटे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चांगल्या कामामुळे कोरोना आटोक्यात आहे.

उपमहापौर तुषार हिंगे: सर्व पक्षांची एकजूट आणि महापालिका , पोलीस प्रशासन यामुळे कोरोना कमी होण्यास मदत झाली आहे.  मोफत आरोग्य सेवा द्यावी.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, सुरुवातीपासून प्रशासनाने कोरोना बाबत चांगल्या उपाययोजना केल्या. त्यामळे कोरोना आटोक्यात आला आहे. ३९ फिव्हर क्लिनिक, ३२ प्रभागात टीम सज्ज केल्या, विभाग पातळीवर भाजी मंडई सुरू केली. आठ मोठया रुग्णालयात उपचारासाठी सोय केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.