BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : एच ए मैदानावर आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

दगडाने ठेचून खून करून जाळला मृतदेह

5,807
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- तरुणाचा दगडाने ठेचून खून करून त्याचा मृतदेह जाळून टाकला. रविवारी (दि. 21) सकाळी आठच्या सुमारास पिंपरी नेहनरूनगर येथील एच ए मैदानात या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

अजय राजेश नागोसे (वय-19 रा. गांधीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजय हा एच.ए. कंपनी येथील कॅन्टीनमध्ये कामाला होता. शनिवारी तो कामाला जातो सांगून गेला तो घरी आला नाही. दरम्यान त्याचा आज, रविवारी सकाळी मृतदेह सापडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पिंपरीत एच ए मैदानात काही तरुण क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. दरम्यान त्यातील एकाला मैदानाच्या अडगळीच्या ठिकाणी मृतदेह असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित पिंपरी पोलिसांना माहिती दिली.सहायक आयुक्त रामचंद्र जाधव, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कामठे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता 20 ते 22 वर्षे वयाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून केला असून त्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. पहाटेच्या सुमारास खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3