Pimpri: एका ‘क्लिक’वर कोरोनाबाबतची माहिती मिळवा, ‘चॅटबॉट’ची सुविधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेमार्फत Whatsapp मोबाईल क्रमाकाद्वारे ‘चॅटबॉट’ची सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध करुन दिली आहे.

त्याद्वारे Covid-19 बाबत नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन होणार आहे. कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी.. Covid-19 चाचणी केव्हा करावी? अशा प्रकारची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी. महापालिकेमार्फत आज (गुरुवार) पासून Covid 19 सदर्भातील अद्ययावत माहितीकरिता “whatsapp द्वारे Chatbot ची सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे.

Whatsapp द्वारे महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी 9922501450 हा नंबर आजच आपल्या मोबाईलमध्ये Save करून Hi असे टाईप करुन संपर्क साधल्यास खालील माहितीचा मेल महापालिकेमार्फत मोबाईलवर पाठविणेत येईल. त्यातील क्रमानुसार नागरिक इच्छित माहिती प्राप्त करू शकता.

Covid-19 तपासणी केंद्र, जेष्ठ नागरिकांसाठी मोफत औषध वितरण, मोफत अन्न वितरण केंद्रांची यादी, तक्रार नोंदणी, Covid-19 माहिती पुस्तिका, Covid-19 चाचणी केव्हा करावी?, Covid-19 संदर्भात कोणती काळजी घ्यावी. काय कर नये, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहेत. तसेच इतर अत्यावश्यक सेवांसाठी नागरिक 8888006666 या सारथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकता.

Whatsapp chatbot नंबर 9922501450 मोबाईलमध्ये Save करून Whatsapp Chat द्वारे नागरिक महापालिकेशी संपर्क साधू शकतात. या सुविधेचा शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपयोग करावा असे महापालिकेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.