Pimpri : फूलविक्रेत्यांची  घबाडषष्ठी

एमपीसी न्यूज –  दिवाळीनंतर फुलविक्रेत्यांनी घबाडषष्ठी  परंपरागत पध्दतीने साजरी केली. यानिमित्त पिंपरी उपबाजारात वजन काटा, हिशेब वही आदी साहित्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर कामगारांना बोनस व मिठाईचे वाटप करण्यात आले. 

सप्तशृंगी पुष्प  भांडारचे गणेश आहेर, फुल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार मोरे. विकास जाधव, दत्ता फुले, बाबा रासकर, दत्ता ठाकर, शिवाजी सस्ते, बाबा तापकीर, अनंता फुले, शाम मांडगे, संजय बोडके, बाळू वाघुले, राहूल जाधव, धनाजी सोनवणे, सुधीर राजगर आदी उपस्थित होते.
व्यवसायात वृध्दी व्हावी, याकरिता दिवाळीनंतर फुल विक्रेत्यांकडून घबाडषष्ठी साजरी केली जाते. या अंतर्गत वर्षभर वापरातील साहित्याची पूजा केली जाते. आज मंगळवारी (दि. १३ ) सकाळी या साहित्याचे पूजन करण्यात आले. फूलविक्रेते आणि फूल उत्पादक शेतकरी यांच्यात वर्षभरात होत असलेल्या खरेदीविक्री व्यवहारात दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असते. या व्यवहारात विक्रेत्यांकडे देणी बाकी असते. वर्षभरातील या दिवशी शेतक-यांची ही सर्व देणी चुकती केली जाते. त्यानिमित्त पिंपरीतील फूलविक्रेत्यांनी शेतक-यांनादेखील मिठाईचे वाटप करण्यात आले. दरम्यान घबाडषष्ठीनिमित्त फुल खरेदीविक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र छटपुजेनिमित्त उत्तर भारतीयांची गैरसोय होऊ नये, म्हणून पिंपरीतील फूलविक्रेत्यांनी काही काळ किरकोळ फूलविक्री सुरु ठेवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.